Saturday 29 March 2014

शेतावर दिसणाऱ्या काही तणाच्या जाती व त्यांची उपयुक्तता


1. घागरा , शंकेश्र्वर  - [Cocklebur]

प्राण्यासाठी विषारी पण आयुर्वेदात औषधी उपयोग आहे.

Life stages of Common cocklebur

2.  घाणेरी - Lantana Camera


File:LantanaFlowerLeaves.jpg


3. निरगुडी


4. गुळवेल -  Tinospora cordifolia 




5. 




Monday 17 March 2014

भातासाठीचे ढोबळ नियोजन

भातासाठीचे ढोबळ नियोजन ह्याप्रमाणे केले आहे. [2014]

एक दोन वेळा थोडे बदल करावे लागतील. लाखी डाळीचे बी आधी आणावे लागेल.


  • हरबरा कापल्यानंतर काय पेरायचे ? 


  • बांधावर सुरवातीला काय लावावे ? नाचणी ?


  • कमोदचे पिक चांगले आले. ह्यावर्षी कमोद किंवा इंद्रायणी लावायचे का ?
  • पाउस उशिरा आल्यास १५ दिवसांनी वाफ्यावर परत रोपे करायची का ?
  • खालील नियोजनात काय सुधारणा लागतील ?



Saturday 8 March 2014

भाजीपाला नकाशा

चित्रात दाखविल्याप्रमाणे ६० फुट x ६० फुट लांबीच्या भागात भाजी घेता येईल

रोपांची संख्या

X - कांदा - ४८००

- मिरची - २००

- मका - २००

- झेंडू  - २००


  • मक्याच्या जागी चवळी घेता येईल. 



  • मिरची च्या ऐवजी वांगी , टोमाटो , कोबी , फुलगोबी 



  • कांद्या च्या ऐवजी लसुण , पालक, मेथी, चुका …। 

निळा रंग सरीचा आहे

वाफ्याची व सरीची रुंदी १.५ फुट आहे.

वाफ्यावरील रोपमधील अंतर २ फुट आहे.

कांद्याच्या २ रोपांमधील अंतर ६ इंच आहे


Friday 7 March 2014

टोमाटो - Tomato

उन्हाळ्यामध्ये गादीवाफ्यावर Tomato लागवडी साठी खालील पद्धत करून बघणार आहे.

१. गिरीपुष्प / शेवगा दर ५ फुटावर - आधार / सावली / आच्छादन

२. झेंडू दर ४ Tomato नंतर - फुले , सुत्रकृमी नियंत्रण

३. झुडूपी चवळी / वाल -  नत्र , आच्छादन

४ .  Tomato -  मुख्य पिक ,  देशी वाण

आकृतीमध्ये  सरीचा रंग निळा आहे.  गादीवाफा   ४ फुटाचा  आहे .

४० फुट  X ६० फुट भागात रोपांची संख्या -


  1. शेवगा / गिरीपुष्प - G - 96
  2. झेंडू - Z - 128
  3. झुडूपी चवळी/वाल - C- 344
  4. टोमाटो - T - 472


Thursday 6 March 2014

जीवामृत




एका एकरासाठी साहित्य 

  1. पाणी - २०० लिटर
  2. देशी गाईचं शेण - १० किलो
  3. देशी गाईचं गोमुत्र -  ५ -  १०  लिटर
  4. जीवाणू माती मुठभर
  5. बेसन - १ किलो
  6. गुळ - १ किलो

हे सगळे एकत्र करून ४ दिवस आंबवावे. 

रोज सकाळ दुपार संध्याकाळ १० वेळा ढवळावे 


मिश्रण सावलीत ठेवावे. 

पिकाला दर वेळी पाणी देताना वाहत्या पाण्यातून एका एकरासाठी द्यावे 

बीजामृत

जमिनीतून पिकांना होणाऱ्या रोग संक्रमणासाठी  व बी द्वारे येणाऱ्या रोगांसाठी बियांवर पेरणीपूर्वी संस्कार करणे आवश्यक आहे .

साहित्य 

१.  पाणी - २० लिटर
२. देशी गाईचं शेण - १ किलो
३. देशी गाईचं गोमुत्र - १ लिटर
४. देशी गाईचं दुध - १०० मिली
५. जीवाणू माती मुठभर
६. कळीचा चुना - ५० ग्रॅम 


  • आम्ल - विम्लता संतुलित करण्यासाठी [Ph] कळीचा चुना वापरतात .
  • जीवाणू संवर्धनासाठी आवश्यक वाढ संवर्धके दुधातून मिळतात . 
  • जीवाणू माती ज्याचे बीज आहे त्या रोपा जवळील घ्यावी 
  • शेण हे सर्वोत्कृष्ठ बुरशी नाशक, जंतू रोधक असून संजीवकांची खाण आहे 
  • गोमुत्र हे उत्तम जन्तुरोधक व नत्राचे भांडार आहे 


सगळे साहित्य मिसळून रात्रभर भिजत ठेवावे . सकाळी एकदा ढवळून घ्यावे.

बियांवर रासायनिक प्रक्रिया केली असल्यास बिया पाण्यात एकदा बुडवून घ्याव्या व सुकवाव्या

बिया जमिनीवर पसरवून त्यावर बिजामृत शिंपडावे व वर खाली करावे म्हणजे बियांवर एक थर जमा होईल.

या नंतर सावलीत बी सुकवावे व नंतर पेरावे

हीच प्रक्रिया रोपे करून पुन्हा लागवड करतात तेव्हा रोपाच्या मुळयावर करावी .



Wednesday 5 March 2014

घन जीवामृत

रोपे तयार करताना, पेरणीच्या आधी शेतात घन जीवामृत वापरल्यास येणारी रोपे / पिके जोमाने वाढतात.

घन जीवामृत आधी तयार करून साठवता येते व वर्षभर वापरता येते.

घन जीवामृत बनविण्यासाठी खालील साहित्य लागेल

१. देशी गायीचे ताजे शेण - १० किलो
२. देशी गायीचे गोमुत्र - १ लिटर
३. बेसन - १ किलो
४. गुळ - १ किलो

कृती 
-------

१. गायीचे १० किलो शेण जमिनीवर पसरवा . 
२. त्यात एक किलो गुळ बारीक करून मिसळा . 
३. त्यात एक किलो बेसन मिसळा . 
४. एक लिटर गोमुत्र शिंपडून टाका. 
५. सावलीमध्ये हे सगळे मिश्रण वाळवायला ठेवा . 
६. वाळवून झाल्यावर थोडे हातांनी थोडे बारीक करून [वाळूच्या कणापेक्षा थोडे मोठे ] पोत्यात भरून ठेवा. 

घन जीवामृत तयार झाल्यावर  पोत्यात भरून ठेवा. 

पोते जमिनीच्या थोडे वर ठेवल्यास जमिनीतील ओलावा शोषून घेत नाही व घन जीवामृत कोरडे राहते.






Tuesday 4 March 2014

प्रस्तावना

बार्शीला श्री सुभाष पालेकर यांचे चार दिवसांचे नैसर्गिक शेती वरील शिबीराचे आयोजन केले होते. [२८ फेब ते ३ मार्च ]

त्या शिबिरात झालेल्या चर्चा व त्यानंतर नैसर्गिक शेती विषयी घेतलेल्या पुस्तकांतील नोंदी संग्रही करण्याचा हा प्रयत्न आहे.

वाचताना बरेच प्रश्न पडतात पण त्याचे उत्तर तेव्हाच मिळत नाही.

इथे प्रश्न नोंदविल्यास व वाचकास उत्तर माहित असल्यास तो इथे लिहील व याचा फायदा सर्वांनाच होईल हा उद्देश !

मित्राच्या शेतावर वाचनाबरोबरच प्रत्यक्ष प्रयोगहि सुरु करणार आहे. त्याच्याही निरीक्षणाच्या नोंदी/चुका इथे लिहिता येतील


माझ्या काही  नोंदी या ठिकाणी ....