Wednesday, 5 March 2014

घन जीवामृत

रोपे तयार करताना, पेरणीच्या आधी शेतात घन जीवामृत वापरल्यास येणारी रोपे / पिके जोमाने वाढतात.

घन जीवामृत आधी तयार करून साठवता येते व वर्षभर वापरता येते.

घन जीवामृत बनविण्यासाठी खालील साहित्य लागेल

१. देशी गायीचे ताजे शेण - १० किलो
२. देशी गायीचे गोमुत्र - १ लिटर
३. बेसन - १ किलो
४. गुळ - १ किलो

कृती 
-------

१. गायीचे १० किलो शेण जमिनीवर पसरवा . 
२. त्यात एक किलो गुळ बारीक करून मिसळा . 
३. त्यात एक किलो बेसन मिसळा . 
४. एक लिटर गोमुत्र शिंपडून टाका. 
५. सावलीमध्ये हे सगळे मिश्रण वाळवायला ठेवा . 
६. वाळवून झाल्यावर थोडे हातांनी थोडे बारीक करून [वाळूच्या कणापेक्षा थोडे मोठे ] पोत्यात भरून ठेवा. 

घन जीवामृत तयार झाल्यावर  पोत्यात भरून ठेवा. 

पोते जमिनीच्या थोडे वर ठेवल्यास जमिनीतील ओलावा शोषून घेत नाही व घन जीवामृत कोरडे राहते.






Tuesday, 4 March 2014

प्रस्तावना

बार्शीला श्री सुभाष पालेकर यांचे चार दिवसांचे नैसर्गिक शेती वरील शिबीराचे आयोजन केले होते. [२८ फेब ते ३ मार्च ]

त्या शिबिरात झालेल्या चर्चा व त्यानंतर नैसर्गिक शेती विषयी घेतलेल्या पुस्तकांतील नोंदी संग्रही करण्याचा हा प्रयत्न आहे.

वाचताना बरेच प्रश्न पडतात पण त्याचे उत्तर तेव्हाच मिळत नाही.

इथे प्रश्न नोंदविल्यास व वाचकास उत्तर माहित असल्यास तो इथे लिहील व याचा फायदा सर्वांनाच होईल हा उद्देश !

मित्राच्या शेतावर वाचनाबरोबरच प्रत्यक्ष प्रयोगहि सुरु करणार आहे. त्याच्याही निरीक्षणाच्या नोंदी/चुका इथे लिहिता येतील


माझ्या काही  नोंदी या ठिकाणी ....